लाडकी बहीण योजनेचे e-KYC करताना OTP येत नाही? हा सोपा उपाय करा, लगेच होईल KYC!

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेतून महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये दिले जातात. पण आता या योजनेचा फायदा घेण्यासाठी e-KYC करणे सर्व महिलांसाठी गरजेचे झाले आहे. e-KYC म्हणजे तुमची माहिती ऑनलाईन तपासली जाते, ज्यामुळे पैसे वेळेवर थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतात.

अनेक महिलांना e-KYC करताना अडचणी येत आहेत. जसे की, आधार कार्डाशी जोडलेल्या मोबाईलवर ओटीपी (OTP) न येणे किंवा उशीराने येणे. त्यामुळे काहींना हप्ता मिळण्यातही अडचण होत आहे. पण काळजी करण्यासारखे काही नाही. या समस्येवर सोपे उपाय आहेत.

जर ओटीपी येत नसेल, तर सर्वप्रथम मोबाईलमध्ये चांगले नेटवर्क आहे का हे बघा. इंटरनेट व्यवस्थित चालत आहे का, ते तपासा. दुसरे म्हणजे, तुमचे बँक खाते आधार कार्डाशी लिंक केले आहे का आणि त्यावरील नाव, माहिती एकसारखी आहे का, हे खात्री करून घ्या. तिसरे म्हणजे, अर्ज प्रशासनाने मंजूर केला आहे का, याची स्थिती ऑनलाईन तपासा. आणि तरीही अडचण राहिली, तर जिल्हा प्रशासन किंवा महिला व बालविकास विभागाशी थेट संपर्क साधा.

e-KYC करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाइटला (https://ladakibahin.maharashtra.gov.in) जा. तिथे ‘e-KYC’ बॅनर दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड भरा. मग ‘Send OTP’ वर क्लिक करा. मोबाईलवर आलेला ओटीपी फॉर्ममध्ये टाका आणि ‘Submit’ वर क्लिक करा.

ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचा हप्ता थांबणार नाही आणि तुम्हाला दर महिन्याला १,५०० रुपये नियमित मिळत राहतील.

Leave a Comment